Breaking News

6/recent/ticker-posts

सांगवी शिरपूर घटनेत आदिवासी बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांचे आदिवासी संघटनाच्या मीटिंग दरम्यान आश्वासन

राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्यासह शिष्टमंडळ यांची सांगवी शिरपूर प्रकरणा संदर्भात आदिवासी मुलांवर झालेले गुन्हे मागे घेण्या संदर्भात पोलीस आयुक्त श्री संजय बारकुंड साहेब यांच्या सोबत सकारात्मक चर्चा
सांगवी शिरपूर घटनेत आदिवासी बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांचे आदिवासी संघटनाच्या मीटिंग दरम्यान आश्वासन सध्या आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांचे आव्हान

पोलीस आयुक्त श्री संजय बारकुंड साहेब यांनी केलेल्या शांतता राहण्याचे आव्हानला आदिवासी बांधवांनी साथ देऊन आपल्या मुलांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांचे आव्हान.  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांना दि 10 ऑगस्ट 2023 रोजी चारन समाजाच्या मुलांनी आदिवासी क्रांतिकारक यांचे बॅनर फाडून टाकल्याने आदिवासींचा भावना दुखावल्या असून आदिवासी क्रांतिकारक यांची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ अनुसुचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocities act) गुन्हे दाखल करण्यात येऊन तत्काळ त्या आरोपींना अटक करावी तसेच आदिवासी क्रांतिकारक यांचे बॅनर फाडल्याने संबंधित आरोपींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या आदिवासी बांधवांना मारहाण झाल्याने ते मुले धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर आदिवासी मुलांना मारहाण झाल्याने सांगवी गावात त्या चारण समाजाच्या लोकांच्या चुकीमुळे वातावरण दूषित होऊन दंगलीचे स्वरूप आले त्यातील काही 200 चे आसपास गरीब आदिवासीं बांधवांवर 307, 353 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून सदर या घटनेला जबाबदार चारण समाजाचे लोक असून त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता त्यांना अटक न* *करता आदिवासी समाजाच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अटक करण्यात येत आहे त्यामूळे आदिवासी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सांगवी गावात शांतता समितीची मीटिंग घ्यावी व 200 चे आसपास असलेले बरेच गुन्हा दाखल असलेले आदिवासी बांधव निर्दोष असून त्यांचावरील गुन्हे मागे घ्यावे व आदिवासी मुलांवर 307, प्रमाणे दाखल केलेला गुन्हा घडलेला नसल्याने हा कलम रद्द करावा व आदिवासी बांधवांना जबरदस्तीने पडकून अटक करण्यात येऊ नये व आता अटक सत्र थांबवावे या संदर्भात निवेदन देऊन सकारात्मक चर्चा झाली धुळे पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड साहेबांनी शब्द दिला की दिलेल्या निवेदनतील मागण्या मंजूर करू आणि 307 चा कलम नक्की रद्द करण्यासाठी हायकोर्टातून मदत करू ज्या मुलांचं संबंध नाही त्यांची यादी द्या आम्ही ते नाव काढून टाकतो व कोणत्याही मुलाच्या घरच्यांना त्रास दिला जाणार नाही आणि अटक सत्र सुरू आहे ते तत्काळ थांबवले असून सर्व आदिवासी बांधवांनी शांतता राखण्याचे आव्हान केले असून तरी त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड साहेबांनी केलेल्या आव्हानाला साथ देऊन पोलीस प्रशासन यांना सहकार्य करून आदिवासी मुलांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नाला यश येईल त्यामुळे सध्या सर्व आदिवासी बांधवांनी शांतता राखावी असे आव्हान लकीभाऊ जाधव यांच्या कडून करण्यात येत असून पोलिस अधिक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांच्यासोबत मीटिंग यशस्वी होऊन सकारात्मक चर्चा झाली त्याप्रसंगी धुळे जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दीपकदादा अहिरे , के ए ग्रुप अध्यक्ष गायक संदीप गवारी,परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बबलू मोरे,प्रदेश महासचिव एड दारासिंग पावरा,उपाध्यक्ष विक्रम पाडवी, सरचिटणीस बाळा पाडवी,एकलव्य संघटनेचे साळवी साहेब,एड दीपक विधाते,पिंटू गायकवाड, रामेश्वर भोये व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ