Breaking News

6/recent/ticker-posts

आता सुट्टीसाठी अर्ज आनलाईन करावे लागेल e-leave HRMS login - शासकीय कर्मचाऱ्यांना रजेसाठी आता करावा लागणार ऑनलाईन अर्ज | eLeave साठी eHRMS portal वर सुविधा उपलब्ध

 eHRMS (Human Resource Management System) प्रणाली 

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात eHRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दि.०३ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.


eHRMS प्रणालीमध्ये leave या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. eHRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.



प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणेकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक ०१ एप्रिल २०२४ पासुन  eHRMS (Human
Resource Management System) प्रणाली क्रियान्वित  करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व  शासकीय
अधिकारी  / कर्मचारी  यांची डिजिटल  सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत.
  बऱ्याच विभागामध्य आनलाइन अर्ज सादर करण्याच प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. eHRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.



   प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणेकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक ०१ एप्रिल, २०२४ पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत असे परिपत्र काढण्यात आले आहे.
रजे साठी  ऑनलाईन येथे करा
https://e-hrms.gov.in/login 

eLeave च्या अंमलबजावणीबाबत दि.०१ एप्रिल, २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फत सादर करणेबाबत शासन परिपत्रक
https://drive.google.com/file/d/1cMTXv03DPRZCjKU0MMDvGTed8DkKAiSi/view

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ