शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल बोराडी जवळील नवागाव येथील रहिवासी प्रधान रायसिंग पावरा ह्यांचे सुपुत्र चि.राहुल प्रधान पावरा ह्याचे आसाम रायफल फौजी अंतर्गत यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झाल्याबद्दल आज बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १४ एप्रिल रोजी गावात अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीरामदादा पावरा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या साक्षीने आयोजित करण्यात आला.
ह्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशिरामदादा पावरा, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी रमण पावरा, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी जयवंत पाडवी, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा, राहुलचे प्रशिक्षक युगल अकॅडमीचे संस्थापक संदीप सोनवणे सर, युवा नेतृत्व बोराडीचे शशांक रंधे, मंजीत पवार, सरपंच विश्वास पावरा, आत्माराम पावरा, रामेश्वर पावरा, राजू पावरा, सखाराम पावरा, भाईदास पावरा अनेक आजी माजी सरपंच सदस्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी, तालुक्यातील अनेक सामजिक संघटनेचे पदाधिकारी, परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ह्यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक, नातलग व मोठ्या संख्येने उपस्थित गावपरिसरातील तालुक्यातील नागरिकांनी राहुलचा गौरव व सत्कार करत आशीर्वाद दिला.
ह्यावेळी सूत्रसंचलन व आभार डॉ.हिरा पावरा व संजय पावरा सर ह्यांनी केले.

2 टिप्पणियाँ
Nice
जवाब देंहटाएंCongratulations bro
जवाब देंहटाएं