Breaking News

6/recent/ticker-posts

कृषि क्षेत्रात उद्योजक बनण्याच्या भरपूर संधी - डॉ. रामनाथ जगताप, राजेंद्र वसावे...

 कृषि क्षेत्रात उद्योजक बनण्याच्या भरपूर संधी -


डॉ. रामनाथ जगताप, राजेंद्र वसावे...



डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्रात सुरु असलेल् या १८ व् या कृषि तंत्रज्ञान महोत् सवात दि. २१ डिसेंबर २०२४, शनिवार रोजी कृषि उद्योग परिषदेव्दारे तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप करण् यात आला. या प्रसंगी बोलताना मा.डॉ. रामनाथ जगताप, बायो हर्बल प्रा. लि. पिंपळगाव बसवंत यांनी कृषि क्षेत्रात उद्योजक बनान्यासाठी भरपूर संधी व वाव असल्याचे प्रतिपादन केले. त्यानी गाव स्तरापासुन ते निर्याती पर्यंत कृषि क्षेत्रातील संधी सहउदाहरण उपस्थितांसमोर मांडले.


कृषि उद्योग परिषदेत अध्यक्ष स्थानी मा.डॉ. नितीनजी पंचभाई, सचिव, डॉ. हेडगेवार सेवा समिती, विशेष अतिथी म्हणून मा. श्री. केदारनाथ कवडीवाले अध्यक्ष, डॉ. हेडगेवार सेवा समिती, मा. डॉ. यु. बी. होले, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, नंदुरबार, मा. श्री. पाटीलभाऊ माळी, विश्वस्त, डॉ. हेडगेवार सेवा समिती, श्री. गणेश पठारे RSETI नंदुरबार, श्री. राजेंद्र वसावे, मशरूम शेती, आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात श्री. जयंत उत्तरवार, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी तंत्रज्ञान महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थिताना दिली. यावेळी डॉ. होले यांनी कृषि शिक्षणात होत असलेले बदल कृषि उद्योजक बनण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले. श्री. पाटिल भाऊ माळी यांनी कृषि शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री. केदारनाथ कवडीवाले यांनी आजच्या तरुणांनी कृषि शिक्षण घेउन आधुनिक शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन पंचभाई यांनी तंत्रज्ञान महोस्तावातील महत्वपूर्ण कार्यक्रम व त्यामागील भूमिका स्पष्ट केली. कृषि शिक्षण घेतलेल्या युवकांनी आधुनिक शेती करून सोबत नाविन्यपूर्ण जोड़धंदा केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो असे प्रतिपादन उपस्थितांसमोर केले.


कृषि उद्योग परिषदेत डॉ. रामनाथ जगताप यांनी यांनी स्वतः व्यवसाय करण्यासाठी आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात आणि आजवर त्यानी मिळालेल्या पेटंट बद्दल माहिती सांगितली. यावेळी त्यानी कृषि पदवीधर काय काय करू शकतो याची यादीच उपस्थितासमोर ठेवली. दुसर्या सत्रात


कृषि उद्योग परिषदेसाठी मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी व कृषि महाविद्यालय नंदुरबार व दोंडाईचा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. पद्माकर कुंदे, केंद्र संयोजक, मुक्त शिक्षण केंद्र, कोळदा, नंदुरबार यांनी केले. श्री. सौ. आरती देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र यांनी आभार प्रदर्शन केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञ डॉ. वैभव गुरवे, डॉ. अदित्य देशपांडे श्री. राजेश भावसार, श्री. प्रविण चव्हाण तसेच विकास सहयोगी गीता कदम, कमलकिशोर देशमुख, दुर्गाप्रसाद पाटील, संदिप कुवर, रेणुका कुलकर्णी, किरण मराठे, रजेसिंग राजपूत, कैलास सोनवणे, आणि जितेंद्र माळी व मीना राठोड यांनी सहकार्य केले.


*मशरूम शेतीवर मार्गदर्शन*


मशरूम शेतीवर मार्गदर्शन मशरूम शेती करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात असलेला वाव व सद्यस्थितीत होणारी मशरूम शेती याबद्दल श्री. पद्माकर कुंदे, केंद्र संयोजक, मुक्त शिक्षण केंद्र, कोळदा, नंदुरबार यांनी मार्गदर्शन केले.

श्री. राजेंद्र वसावे मशरूम उद्योजक यांनी मशरूम उद्योगातील प्रेरणादायी प्रवास उपस्थितानासमोर कथन केला. यावेळी बोलताना त्यांनी मशरूम शेती करण्यासाठी लागणारे हवामान व इतर घटक उपलब्ध असल्याने नंदुरबार जिल्ह्यात हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन केले.

*विशेष सत्कार-*

कृषि उद्योग परिषदेच्या निमिताने मुक्त कृषि शिक्षण कोळदा येथे शिक्षण घेतलेले श्री. अजय हिम्मत पाटील, चोपड़ा जि. जळगाव यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मुक्त कृषि शिक्षण कोळदा येथून कृषि पदवी पर्यंत शिक्षण घेउन शेती करण्यास सुरुवात केली. केळी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यात केळी आहे. तसेच कांदा, टरबूज, हरभरा पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. याबद्दलची यशोगाथा अग्रोवन या दैनिकात प्रशिद्ध झालेल्या आहेत. यावेळी श्री अजय पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ