Breaking News

6/recent/ticker-posts

लग्नात उन्माद करणाऱ्या (बिनबुलाये बराती) टोळक्यांनो जरा सावधान चेतावनी नाही तर तुरुंगातच बरात निघेल

 

तालुका पोलीस ठाणे सांगवी कडून आवाहन._

     

तरुणांनो आपले भविष्य आपल્या हातात निवडा चागले पर्याय दवाखाने पोलिस स्टेशन की आपले कुटुंब कोना सोबत राहायचय..

 सातपुडा भागात आपापल्या कुवतीनुसार लोक लग्न समारंभ आयोजित करतात. सगळ्यांनी आनंदाने सहभागी होवून लग्नाची शोभा वाढवावी आणि शांततेत लग्न सोहळा पार पडावा. एवढी रास्त आणि माफक अपेक्षा कुटुंब प्रमुखाची असते.                                         

       परंतू समाजातील काही तरूणांचे टोळके डेअर डेवील, आदिराजे, रावणराजे नावाचे गृप करून लग्नात आमंत्रण नसतांनाही केवळ नाचण्यासाठी कोणत्याही ठिकाणी लग्नात विनाकारण गर्दी करून, प्रसंगी दोन गटात वाद करून मारामारी करणे, गंभीर जखम करणे, सामाजिक उपद्रव पसरवण्यासारखे विध्वसंक कृत्य गैंगमधील टाळके करत आहेत. त्यामुळे लग्न कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक स्वरूपात मोठे  नुकसान होते. तर मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी दूसरा गृप पुढच्या लग्नात तयारच असतो. अशा प्रकारे त्या टोळक्यांची ही उपद्रवी मालीका सुरूच असते. अशा विविध गृप्सना तालुका पोलिस स्टेशन सांगवी कडून आवाहन करण्यात येते की, कोणत्याही लग्न समारंभात टोळीयुद्ध छेडणाऱ्यांविरोधात कोणाची जरी तक्रार आली तरी विडीयो शुटींगच्या माध्यमातून ओळख पटवून शामील असणाऱ्या सर्वांवरच कडक कलमे लावून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून चांगलाच समाचार घेतला जाईल. आणि कोणाचिही शिफारस ऐकून घेतली जाणार नाही. अशा उपद्रवी टाळक्यांविरोधात तक्रार देण्यासाठी समाजातूनही पुढे येण्याचे आवाहन तालुका पोलीस ठाणे सांगवी मार्फत करण्यात येते. 


समाजातील सामाजिक कार्यकते ग्रामस्त मंडळी आणि जबाबदार ग्रामस्त ह्याना आव્हाहन आहे की असले प्रकार थांबविण્या साठी तुम्ही ही स્वता तक्रार देण्यासाठी समाजातूनही पुढे येण्याचे आवाहन करण्यात येते आहे व असले टवाडखोर बिन बुलाये बराती ला लगाम घालु . 


सुरेश शिरसाठ

सहायक पोलिस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशन सांगवी. 



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ