शहादा शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असणा-या तहसील कार्यालय शहादा येथे लोकांना व कर्मचाऱ्यांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती.बिरसा फायटर्स संघटनेकडून याबाबत तहसीलदार शहादा यांना निवेदन देऊन आवाज उठविण्यात आला होता.तालुक्याचे मुख्य शासकीय ठिकाण असूनही पाण्याची सोय नाही.

बिरसा फायटर्सचा आवाज प्रशासन पर्यंत पोहचला.अन् तहसील कार्यालय शहादा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ६ मोठे माठ भरून पाणी ठेवण्यात येत आहेत.
परिसरात अनेक लोकांना आपल्या शासकिय निमशासकिय कामासाठी तहसिल कार्यालय यांवे लागत असते गावा खेळ्याहुन अनेक लोकांना आपल्या सोबत लहान लेकर घेवुन येत असतात व त्या वेळी दमुन थकुन आल्यावर पाण्यासाठी मोठी गैरसोई होत होती खिशात पैसे नसले तरी इकडुन तिकडुन पैसे जमवुन पाण्याची तहान भागवत होते परंतु आता बिरसा फायटर्स च्या मागणी नंतर आता सहा मोठ मोठे माठ भरून पाणी ठेवण्यात येत आहे त्यामुळे तहानलेल्यांची तहान ठंडगार पाण्याने तहान भागत आहे.
संघटनेच्या कामाचे सर्वत्र कौतुक केली जात आहे ह्यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी केलेल्या मांगणीचे तात्काळ अ़मलबजावणी केल्यामुळे तहसिल कार्यालय शहादा यांचे आभार मानले
1 टिप्पणियाँ
Good nice
जवाब देंहटाएं